पुणे:रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट खात्यात रोख रक्कम जमा करण्याच्या शासन निर्णयाविरोधात आता सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा वादा करते तर दुसरीकडे हमीभाव देऊन धान्य खरेदीची यंत्रणा म्हणजे अन्न महामंडळ मोडीत काढण्याचा अर्थात रेशन यंत्रणा मोडीत काढण्याचा डाव रचते; हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप करत, याविरोधात अन्न अधिकार अभियान संघटनेने २१ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.