शेतकऱ्यांना पाट्या लावून आरोपी सारखे शेतीचे पंचनामे

0

रावेर येथे धनंजय मुंडे

रावेर:- मराठवाड्यात झालेल्या गार-पिठवर सरकार शेतक-याना पाट्या लावून आरोपी सारखे शेतीचे पंचनामे करीत आहे मुख्यमंत्री साहेबांनी शेतकरी असल्याचे सिद्द करण्याचे ज़ाहिर आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. छोरिया मार्केट येथे आज हल्ला-बोल सभा आयोजित केली होती.

यावेळी खा सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी प्रदेशध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अरुण भाई गुजराथी,चित्राताई वाघ,युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल,माजी आ अरुणदादा पाटील, प.स. सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, नगरसेवक राजेंद्र वानखेड़े, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,रमेश पाटील,सोपान पाटील,राजेंद्र चौधरी कु:सिमरन वानखेडे आदी आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी हल्ला-बोल सभेसाठी सुरुवातीला अपेक्षित नागरिकानीं प्रतिसाद न दिल्याने अखेर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यासपीठा वरुन राष्ट्रवादिच्या पदाधिकारी कार्यकत्यांना खाली मंडपात येऊन बसण्याचे अवाहन केले.