शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेणार- दीपक केसरकर

0

मुंबई | परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर व एनर्जी लिमिटेड या कारखान्याने खासगी बँकांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतले आहे. या प्रकरणाची न्यायालयाच्या निर्देशानुसार सीआयडी चौकशी सुरू आहे. मात्र यामुळे या शेतकऱ्यांना इतर बँकाचे कर्ज मिळण्यास अडचण येणार नाही व हे कर्ज थेट कारखान्याच्या नावावर घेतल्याने या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचण येणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता शासन घेईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य सुनील केदार यांनी मांडली होती.

केसरकर म्हणाले, हा आर्थिक स्वरुपाचा गुन्हा असल्याने व या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोष सिध्द झाल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. यासंबंधी बँकांची ७० टक्के कागदपत्रे सील केली आहेत व उर्वरित कागदपत्रे २१ तारखेपर्यंत सील करण्यात येतील. संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल व दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.