मुंबई: शिवेनेने सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले आहे. त्यामुळे आता कर्जमाफी कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे सांगण्यात आले होते. यावरून विरोधक देखील प्रश्न विचारु लागले आहे. दरम्यान राज्यात संपूर्ण कर्जमाफी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. कर्जमाफीसाठी किती निधी लागेल याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतले आहे. संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी ३५८०० कोटींची आवश्यकता आहे. कर्जमाफीसाठी केंद्राच्या मदतीची देखील गरज नाही. महाराष्ट्र स्वबळावर कर्जमाफी करू शकते असे आढाव्यातून पुढे आले आहे.
संपूर्ण कर्जमाफीचा रोड मॅप तयार करण्यात आला आहे.