VIDEO: शेतकऱ्यांसाठी भांडणारा कर्तबगार नेता गेला: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

0

मुंबई: भाजपचे माजी खासदार, माजी आमदार विद्यमान जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

‘हरिभाऊ जावळे यांचा शेती, पाणी, सिंचन याबद्दल चांगला अभ्यास होता, सर्वसामान्यांबद्दल त्यांच्यात नेहमीच आत्मीयता होती. एक कर्तबगार नेता गमविला अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. हरिभाऊ जावळे यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटणारा नेता, आपल्या मतदारसंघात रस्त्याचे जाळे कसे तयार होईल यासाठी नेहमी प्रयत्नरत असलेल्या नेत्याच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.