शेतकऱ्यांसाठी लवकरच गोड बातमी; उद्या शिवनेरीवरून होऊ शकते कर्जमाफीची घोषणा !

0

मुंबई : शिवसेनेने सरकार आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात देखील कर्जमाफीचा समावेश आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार करमाफी करण्यासाठी सकारात्मक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शिवनेरी किल्ल्यावरून कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यत आहे. शिवरायांच्या जन्मस्थळावरून ही घोषणा करण्याची तयार सुरु असल्याचे सांगितले जाता आहे. उद्या मुख्यमंत्री शिवनेरीवर जाणार आहे. त्यानंतर एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा आहे.

उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा करत आहेत. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याचीच उत्सुकता आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची रोड मॅप तयार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. संपूर्ण कर्जमाफीसाठी 35 हजार 800 कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्राच्या मदतीशिवाय कर्जमाफी देणे शक्य असल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत विविध खात्यांशी संबंधित आढावा घेतला होता. विमा कंपन्यांकडे 15 हजार कोटी थकीत आहेत. कर्जमाफीसाठी निधी उभारण्याचे अनेक पर्याय सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कर्जमाफीची घोषणा कधी करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.