कल्याण : नेवाळी येथील सरकारकडून सूरु असलेल्या भूसंपदनाविरोधात जून महिन्यात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन छेडले यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्याविरोधात गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली .त्यानंतर आता ग्रामस्थानी शेतकऱ्यांवर अन्याय होत असून अटकेत असणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी ,त्यांच्या सुटकेसाठी रक्षा बंधन,गोकुळाष्टमी,गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे .
कल्याण-मलंग आणि बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या नेवाळी येथे गुरूवारी 22 जून रोजी शेतकऱ्यांनी जमीन बचावासाठी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळन लागले या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनाची जाळपोळ करत काही पोलीस अधिकरी कर्मचार्यांना मारहाण केली त्यानंतर पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबारात 12 शेतकरी जायबंदी झाले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनि आंदोलनकर्त्यांचे धरपकड सत्र सुरू करत तब्बल यानंतर पोलिसांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तीन आणि मानपाडा पोलिसांत खुनाचा प्रयत्न, दंगल माजविणे, दरोडा, शासकीय मालमत्तेचे नुकसान, शासकीय कामात अडथळा आणणे यांसारखे गंभीरस्वरूपाचे गुन्हे १३५ आंदोलका वर दाखल करत यातील ५८ आंदोलन कर्त्यांना अटक केली होती .या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण होत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांचा नातेवाईकांकडून केला जात आहे.नेवाळी शेतकऱ्यांच्या लढ्याला आगरी, कोळी, कुणबी समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे. कल्याण व परिसरातील अनेक संघटनांनी तसेच सुकाणू समितीने पाठिंबा दिला आहे. यामुळे या शेतकर्याचे मनोधैर्य वाढले असून नेवाळी येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक या पाच जिल्ह्यातील आगरी, कुणबी, कोळी समाजातील लोकांची संघर्ष समिती गठीत करण्यात येणार आहे .दरम्यान आम्ही शेतकरी आहोत अतिरेकी नाही असं टाहो फोडत सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त करत लावण्यात आलेल्या अन्यायकारक कलमे मागे घ्यावीत आहि मागणी करत नेवाळी आणि आसपासच्या गावांनी रक्षाबंधन ,गोकुळाष्टमी ,गणेशोत्सव सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. नेवाळी आंदोलनप्रकरणी अटकेत असणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुटकेसाठी गावातील महिला वर्गाने हा निर्णय घेतला आहे .त्यामुळे जमीन संपादनवरून झालेल्या शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनानंतर चर्चेत आलेला नेवाळी परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.