अमळनेर : शासकीय भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत शेतकीसंघ अमळनेरतर्फे ज्वारी खरेदी केंद्राची सुरुवात बुधवारी 15 रोजी करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती उदय वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, उपसभापती अनिल पाटील, जयवंतराव पाटील यांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय भरड धान्य खरेदी योजनेतून शेतकीसंघ ज्वारी खरेदी ऑनलाइन पद्धतीने करणार असून त्यासाठी सातबारा, पिकपेरा लावून बँक पासबुक, आधार कार्ड अनिवार्य आहे.
शेतकीसंघाने 941 क्विंटल मुग व 201.50 क्विंटल उडीद खरेदी केला आहे. 34 लाख रुपये शेतकर्यांच्या नावे जमा करण्यात आले आहेत अशी माहिती शेतकीसंघाचे संजय पाटील यांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत वाघ, बाळासाहेब शिसोदे, पं.स.सदस्य भीकेश पाटील, विक्रांत पाटील, अॅड.यज्ञनेश्वर पाटील, विवेक पाटील, नीलेश सालुंखे, भटू पाटील, सुभाष पाटील, मंगलगिर गोसावी, भगवान कोळी, महादु पाटील, गोकुळ बोरसे आदी उपस्थित होते.