शेतकी संघावर संतोष चौधरींचे वर्चस्व

0

सावकारे गटाला धक्का ; चेअरमनपदी पंढरीनाथ पाटील तर व्हा.चेअरमनपदी गोविंदा ढोले

भुसावळ : भुसावळ तालुका शेतकी संघाच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांच्या शेतकरी पॅनलने सत्ता मिळवली. चेअरमनपदी पंढरीनाथ तुकाराम पाटील तर व्हा.चेअरमनपदी गोविंदा तुकाराम बोरोले यांची निवड झाली. सावकारे गटाकडे आठ सदस्यांचे बलाबल असतानाच एक सदस्य फोडण्यात चौधरींना यश आल्याने सावकारे गटाला मोठा हादरा बसला.

भाजपाने शेतकी संघ निवडणुकीत प्रथमच चंचू प्रवेश करून चौधरी गटाला धक्का दिला होता तर चौधरी यांनी आपली शक्ती पणाला लावत पुन्हा सावकारे गटाला हादरा दिला. संघावर वर्चस्व व विजय आपलाच होता, असे सांगत त्या सदस्याने आमच्याच गटातर्फे फार्म भरला असल्याचे त्यांनी सांगितले. संघावर वर्चस्व सिद्ध झाल्यानंतर विजयी उमेदवारांचा गुलालाची उधळण करून सत्कार करण्यात आला.