भुसावळ : भुसावळ तालुका शेतकी संघासाठी झालेल्या निवडणुकीत सहकार गटातील आमदार संजय सावकारे यांच्या गटाला आठ जागांवर तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या शेतकरी पॅनलला सात जागांवर यश मिळाले होते. भाजपाने शेतकी संघ निवडणुकीत प्रथमच चंचू प्रवेश करून चौधरी गटाला धक्का दिला होता तर या शेतकी संघाच्या चेअरमन निवडीसाठी सोमवारी निवडणूक होत आहे.
सभापती पदासाठी सावकारे गटातर्फे अनिल पंडित पाटील तर चौधरी गटातर्फे पंढरी तुकाराम पाटील यांनी अर्ज सादर केले आहे तर उपसभापती पदासाठी सावकारे गटातर्फे प्रशांत सुकदेव निकम व चौधरी गटातर्फे गोविंदा ढोले यांनी अर्ज सादर केले आहेत. दोन वाजेच्या सुमारास मतपत्रिका मतपेटीत टाकून मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला असून कोण बाजी मारतो? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.