शेतमालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; एकास जन्मठेप तर सात आरोपीस दहा वर्षाची शिक्षा

0

शहादा (प्रतिनिधी)- आमोद, ता.शहादा येथील शेतात शेतमालकाला मशागत करण्यास विरोध करणार्‍या आरोपीनी शेतमालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न कराणार्‍या एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व त्याला साथ देणारर्‍या सहकारी सात आरोपीस दहा वर्षाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायाधिश पी. बी. नायकवाड यांनी सुनावली. आरोपी हे आप सरकार म्हणजे ए.सी. सरकारचे कार्यकर्ते असल्याने खबरदारी म्हणुन न्यायालयाचा आवारात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. न्यायालयाला छावणीचे स्वरुप आले होते. न्यायालयाचा आवारात खटला सुनावणी पर्यंत इतराना प्रवेश बंद होता. न्यायालयाचा बाहेर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

न्यायालयात आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध
याबाबत सविस्तर वृत्त असे की , 24 जुलै 2016 रोजी फिर्यादी प्रजेश मधुकर चौधरी हे अमोदा गावाचा शिवारातील आपल्या शेतात ट्रॅक्टरने मशागत करीत होते. अचानक दुपारी दोन वाजता सरदार वाहार्‍या चौधरी (रा. मडकाणी, ता. शहादा) यांनी आपल्या सात साथीदारांसह येवुन हातात लाठ्या-काठ्या घेवुन प्रजेश मधुकर चौधरी याला मारहाण केली , चाकुने वार करुन अंगावर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात प्रजेश मधुकर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिसात 307 प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्या गुन्याची गुरुवारी सुनावणी होती. प्रजेश मधुकर चौधरी व राजेंद्र रायसिंग भिल यांच्यात शेतीबाबत दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली होती . प्रजेश चौधरी यांच्या बाजुने निकाल लागलेला होता. प्रजेश चौधरी यांचे वडील मधुकर छगन चौधरी यानी राजेंद्र रायसिंग भिल यांचेकडुन शेती विकत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 24 जुलै 2016 रोजी मशागत करणार्‍या प्रजेश मधुकर चौधरी यास मारहाण करुन जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्या खटल्याची गुरुवारी सुनावणी झाली. जिल्हा सत्र न्या.पी.बी.नायकवाड यांनी या खटल्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख व पोलीस उपनिरिक्षक रमेश वाघरे सह एकुण सात साक्षीदार तपासले. सरदार वाहार्‍या चौधरी (रा. मडकाणी, ता. शहादा) यास जन्मठेप व आठ हजार रुपये दंड तर राजेश सजन भिल, महेंद्र सजन भिल (रा.ब्राम्हणे), अंबालाल मगन भिल, मगन रायसिंग भिल, संदीप सुरेश वळवी, मच्छींद्र पारसिंग वळवीफ., किरसिंग मिर्‍या ठाकरे (सर्व रा. अमोदा, ता.शहादा) यांना 10 वर्षे सश्रम कारावास व चार रुपये दंडची शिक्षा सुनावण्यात आली.