नवापुर। नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मुख्य बाजार नवापूर उपबाजार,चिंचपाडा,विसरवाडी व खांडबारा येथे शेतमालाची विक्री बाजार आवारात सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत पणन मंडळ,गुलटेकडी मार्केड यार्ड पुणे येथील कार्यकारी संचालक यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपुर्ण देशात शेतमालाला योग्य भाव आणि पीक कर्ज माफी या दोन कारणांमुळे शेतकर्यांची आंदोलने सुरू आहेत.शेतकर्यांचा शेतमालाला योग्य भाव मिळावा,लिलाव पध्दतीने खरेदी विक्री व्हावी,परवानाधारक व्यापारी,मापाडी आणि हमाल यांनीच शेतकर्यांचा माल हाताळावा अशी मागणी करण्यात आली आहे. शेतमालाची विक्री झाल्यानंतर 24 तास़ात त्याचा चुकारा व्हावा यासाठी राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झालेली आहे असे आम्हास वाटते. त्यासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आला आहे आणि त्यासाठीच पणन संचालमालय आणि पणन मंडळाची स्थापना झालेली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
व्यापार्यांनी कमिशानाद्वारे कमविले पैसे
नवापुर बाजार समिती उपयोजना क्षेत्रातुन अर्थात एकाधिकार क्षेत्रातुन वगळल्या नंतर जाहीर लिलावाने शेतमालाची खरेदी होईल,बाजार आवारात खरेदी झाल्याने परवानाधारक व्यापारी, मापाडी आणि हमाल हा शेतमाल हाताळतील असे वाटले होते. परंतु बाजार समिती नावालाच अस्तित्व टिकुन आहे. एकमात्र झाले की 1किलो धान्याची खरेदी विक्री न होता नवापुर मुख्य बाजार, विसरवाडी आणि खांडबापा येथे शेकडो व्यापारी गाळे बांधुन कमिशनद्वारे ऱग्गड पैसा कमवला. एवढेच सुयोग्य नियमन केले. साधारणता आँगस्टचा शेवटचा आठवड्या पासुन मुग,उडीद या शेतमालाची काढणी सुरु होईल. गेल्या 15 वर्षात नवापूर कृषी उत्पन्न बादार समितीत एक किलो धान्याची खरेदी झालेली नाही. आजवर आदिवासी शेतकरी लुबाडला गेला आहे.
शेतकर्यांची वर्षांनुवर्ष पिळवणूक : नंदुरबार जिल्हातील नवापूर हा आदिवासी शेतकर्यांचा आदिवासी बहुल वस्तीचा तालुका आहे. काही वर्षापुर्वी महाराष्ट्र शासनाने आदिवासी उपयोजना क्षेत्रात एकाधिकार योजना सुरु केली होती. यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी ङ-चझड अर्थात आदिवासी विकास महामंडळा मार्फत करण्यात येत होती. परंतु कालांतराने नवापूर कृषी उत्पन्न समितीचे क्षेत्र उपयोजना क्षेत्रातुन वगळण्यात आले. बाजार खुला करण्यात आला आदिवासी शेतकर्यांची पिळवणुक वर्षानुवर्ष होत होती त्यांचा शेतीमाल मातीमोल भावाने खरेदी करुन वजन मापात ही लुबाडणुक होत होती म्हणुन हा कायदा होता.
रस्त्यावरची खरेदर बंद करा
यावर्षी आता पासुनच नवापुर कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रात खेडा खरेदी,रस्त्यावरची खरेदी,व्यापार्यांचा दुकानातील खरेदी बंद करावी आणि बाजार समितीचा आवारात जाहीर लिलावाने शेतमालाची खरेदी विक्री सुरु करण्याबाबत बाजार समितीला आदेश द्यावेत. हे सर्व करुन घेण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक नंदुरबार आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नवापुर यांचेवर सोपवावी अन्यथा शेकर्यांमार्फत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर दिलीप नाईक,पाघंराण सरपंच सुहाना गावीत,अजितसिंग वळवी,यशवंत गावीत,गिरीष वळवी,आर सी गावीत,जयंत पाडवी,अनिल गावीत,वेच्या गावीत, अनिल आर गावीत यांचा सह्या आहेत