शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतमाल तारण योजना

0

अमळनेर । येथील बाजार समीतीत शासन शेतकर्‍यांसाठी राबवित असलेल्या योजनांसबंधी सन 2016-17 च्या हंगामात महाराष्ट्र कृषी पणन मंडळ, पुणे यांची शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शेतकर्‍यांच्या शेतीमाल काढण्याचा हंगाम चालु झालेला असुन शेतीमाल मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने शेतमालाचे बाजार भाव घसरतात. आर्थिक अडचण असल्यामुळे मिळेल त्या भावात माल विकावा लागतो. शिवाय त्यांना पर्याय नसतो. परंतू शेतीमाल साठवण करुन कालावधीनंतर विक्री केल्यास वाढलेल्या भावाने विक्री होवुन शेतकर्‍यांना चांगला भाव मिळू शकतो. त्यासाठी शासनाने शेतीमालाला योग्य भाव मिळावा या हेतूने कृषी पणन मंडळाने सन 1990-91 पासुन शेतमाल तारण योजना यशस्वी रित्या राबवित आहेत.