शेतशिवारात रखवालदाराचा अज्ञातांकडून खून; तळोदा पोलिसात गुन्ह्याची नोंद

0

तळोदा । शहरापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या श्रीकृष्ण खांडसरी जवळील कपील शंकरलाल वाणी यांचे शेत अर्धा हिस्सा म्हणून केलेल्या शेतात गेल्या चार वर्षापासून शेतावरील रखवलदार म्हणून काम करणारा प्रकाश रूबजी पाडवी (वय-50, रा.अमोदा ता.कुकरमुडा) हा 31 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री शेतातील झोपडीत खाटेवर झोपलेला असतांना अज्ञात इसमांनी गळ्यात कश्याने तरी फास लावण्याचा प्रयत्न करून लाकडी डेंगार्‍याने डाव्या कानावर मारुन गंभीर दुखापत करून खून करण्यात आला. ही घटना सकाळी 8:30 दरम्यान उघडकीस आला असून या घटनेची तळोदा पोलिसात जंगलसिंग मधुकर पाडवी यांचा फियादीवरुन अज्ञात मारेकर्‍यांना विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. झोपडीपासून श्‍वान शेतपरिसरात फिरुन रस्तापर्यंत मार्ग दाखवत असल्यामुळे मारेकरी पसार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले, जगदीश पवार यांचा पथकाने भेट दिली.