Woman beaten up in Thorgavan due to minor dispute : Crime against three सावदा : शेताच्या सामायीक बांधावरील काटे व झुडूपे तोडण्याच्या वादातून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना थोरगव्हाण येथे 17 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी तिघांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
योगीता बाळू पाटील (35, थोरगव्हाण) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी भगवान रामभाऊ बोरसे, किशोर भागवत बोरसे, राहुल भागवत बोरसे (सर्व रा.थोरगव्हाण) यांच्याविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय पोहेकर करीत आहेत.