भुसावळ- तालुक्यातील पिंपळगाव बु.॥ येथे शेताच्या बांधावर दगड का टाकले? अशी विचारणा केल्याचा राग आल्याने तक्रारदारास मारहाण करीत त्याच्या डोक्यात लोखंडी टॉमी टाकून जखमी करण्यात आल्याची घटना 6 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार प्रशांत लक्ष्मण झोपे (पिंपळगाव बु.॥) यांच्या फिर्यादीनुसार महेश अभिमान इंगळे, अभिमान लक्ष्मण इंगळे, पुंडलिक लक्ष्मण इंगळे, गोपाळ पुंडलिक इंगळे (सर्व रा.पिंपळगाव बु.॥) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 6 रोजी अडीच वाजेच्या सुमारास पिंपळगाव शिवारातील शेत गट क्रमांक 160/3 सामायीक बांधावर आरोपींनी दगड का टाकले हे विचारल्याचा राग आल्याने आरोपींनी तक्रारदाराला मारहाण करीत डोक्यावर लोखंडी टॉमी मारून जखमी केले. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.