शेताच्या बांधावर लावलेली मोटारसायकल चोरीला

0

जळगाव – आव्हाने शिवारातील स्वत:च्या शेताच्या बांधावर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी घडली असून दुचाकी मिळून न आल्याने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशंत नरेंद्र महाजन रा. शनिपेठ किरण टेन्ट हाऊसजवळ शनिपेठ, यांचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गट नं. 7/37 मध्ये शेत आहे. दररोज प्रमाणे त्यांनी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता शेतात दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीई 6830) ने गेले. दुचाकी शेताच्या बांधावर लावली. त्यानंतर दुपारी 1 वाजता परत असल्याने त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. प्रशांत महाजन यांच्या खबरीवरून तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.विजय दुसाने करीत आहे.