धुळे । एकमेकांच्या शेतालगत असलेल्या जमिनीचा वाद उभा राहिल्याने एकाने भूमी अभिलेख शाखेला विनंती करुन शेत जमिनीची मोजणी सुरु केली. त्याकरीता विभागाचे अधिकारी जागेवर दाखल झाले. परंतु ऐनवेळी तेथेही वाद उभा राहिला आणि दोन गटात जोरदार हाणामारी उसळली. परस्परांना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
त्या प्रकरणी दोन्ही गटातर्फे दोन तक्रारी सोनगीर पोलिसात दाखल झाल्या आहेत. हेमराज युवराज पाटील (वय-42), रा. सुकवद, यांच्या म्हटल्यानुसार, 16 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास सुकवद शिवारात मगन राजाराम पाटील यांच्या शेतात शेतमोजणी ठेवली होती. ती मोजणी नियमानुसार केली जात नव्हती. म्हणून फिर्यादी हेमराज पाटील याने अधिकार्यांना त्याबाबत सांगितले त्याचा राग येवून सहा जणांनी हेमराजसह त्याचा भाऊ, वडील यांना मारहाण केली. शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.