शेतातील उभ्या जेसीबीतून चोरट्यांनी डिझेल लांबवले

भुसावळ/जळगाव : भुसावळ रोडवरील गोदावरी हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या शेतामध्ये उभ्या जेसीबीमधून चोरट्यांनी 20 लीटर डिझेल लांबवले. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात दोन भावडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
गोदावरील हॉस्पिटलच्या मागील बाजूस शेतामध्ये जेसीबी (एम.एच. 19 सी.व्ही. 2104) उभे होते. शुक्रवार, 25 मार्च रोजी सायंकाळी या जेसीबीमधून अजय कोळी व त्याचा भाऊ मनोज कोळी (दोन्ही रा. जोगलखेडा, ता.भुसावळ) यांनी नळी टाकून 20 लीटर 1 हजार 911 रुपयांचे डिझेल चोरुन नेत होते. घटनेची माहिती मिळाल्यावर नरेंद्र पितांबर भिरुड यांच्यासह काही जणांनी घटनास्थळ गाठले. दोघेही डिझेल चोरतांना दिसून आले. दोघांना काय करताहेत अशी विचारणा केली असता, दोघेही पळून गेले. याबाबत नरेंद्र पितांबर भिरुड (52) यांनी यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिल्यानंतर अजय कोळी व मनोज कोळी या दोघा भावंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.