शेतातील ट्रान्सफार्मरमधून 40 हजारांची तांब्याची तार लंपास

धरणगाव : शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील 40 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार चोरीला गेली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रान्सफार्मर फोडणार्‍यांची टोळी कार्यरत
धरणगाव तालुक्यातील रोटवद शिवारातील शेत गट नंबर 385/1 येथे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर (4231116) असून त्यातून शेतकर्‍यांना विजेचा पुरवठा होता. गुरूवार, 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता अज्ञात चोरट्याने ट्रान्सफॉर्मरमधील 120 किलो वजनाचे तांब्याचे कॉईल चोरून नेले. या संदर्भात रोटवद येथील कनिष्ठ अभियंता अविनाश बलदेवसिंग पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार करीम सैय्यद करीत आहे.