शेतातून चोरट्यांनी बैलांसह गाय लांबवली : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

Livestock worth 70 thousand was extended from Kurhakakoda Shivara मुक्ताईनगर : शेतकर्‍यांचा जीवा-भावाचा मैतर असलेल्या सर्जा-राजाचा सण एक दिवसा आला असतानाच मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा शिवारातून मात्र चोरट्यांनी 70 हजांचे पशूधन लांबवल्याने शेतकर्‍याला मोठा धक्का बसला आहे.

शेतातून लांबवले पशूधन
तक्रारदार बाळू किसन बोदडे (48, बोरखेडा) यांच्या काकोडा शिवारातील शेतातून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची जर्शी गाय, 15 हजार रुपये किंमतीचा जर्सी बैल, 35 हजार रुपये किंमतीचे दोन बैल मिळून एकूण 70 हजार रुपये किंमतीचे पशूधन 19 रोजी रात्री आठ ते 20 रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान चोरट्यांनी लांबवले. मुक्ताईनगर पोलिसात बोदडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार श्रावण जवरे करीत आहेत.