पाचोरा : चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेत-शिवाराकडे वळवला असून शेतातील सुमारे अडीच लाख रुपये किंमतीची मक्याची कणसे लांबवल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतातून लांबवली मक्याची कणसे
पाचोरा तालुक्यातील बाळद शिवारातील जयश्री महेंद्र पाटील यांच्या मालकीच्या शेतातून मंगळवार, 11 रोजी सकाळी 10 वाजता सुमारे दोन लाख 50 हजार रुपये किंमतीचे मक्याची कणसे लांबवण्यात आली. या प्रकरणी जयश्री महेंद्र पाटील (42) यांनी पाचोरा पोलिसात संशयीत आरोपी शेखर साहेबराव पाटील यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार कैलास पाटील करीत आहेत.