शेतातून ट्रॅक्टर घातल्याने ओझरखेडा येथे एकास मारहाण

0
वरणगाव :- येथून जवळच असलेल्या ओझरखेडा येथे शेतातून ट्रॅक्टर घातल्याने दोघांच्या हाणामारीत  एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवार रोजी सायंकाळी हा वाजता घडली. संजय फुलसिंग पाटील यांच्याकडून मंगलसिंग नथ्थू पाटील यांचा चुलत भाऊ कल्याणसिंग पाटील यांनी शेत विकत घेतले आहे.
या शेतातून मंगलसिंग टट्रॅक्टर नेत असतांना संजय यांनी त्यास विरोध केल्याने उभयतांमध्ये वाद झाला. आरोपी संजय पाटील  यांनी लिंबाच्या काठीने मंगलसिंग पाटील यांना मारहाण केल्याने डोक्यास जबर दुखापत झाली. आरेापी संजय फुलसिंग पाटील यांच्याविरुद्ध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.  तपास हवालदार अशोक जवरे करीत आहेत.