शेतात काम करणार्‍या शेतकर्‍याचा मोबाईल लांबवला : दोघांविरोधात गुन्हा

The farmer of Atraval was beaten and robbed in broad daylight यावल : तालुक्यातील अट्रावल येथील शेतकरी शेतात काम करीत असताना दोन संशयीतांनी शेतात येवून शेतकर्‍याला मारहाण करीत त्याच्याकडील सात हजारांचा मोबाईल व दुचाकीची चावी लांबवली. सांगवी खुर्द शिवारात रविवारी दुपारी तीन वाजता घडलेल्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

अज्ञातांचा पोलिसांकडून शोध सुरू
तक्रारदार शेतकरी सुनील निवृत्ती चौधरी (47, अट्रावल) हे रविवारी दुपारी शेत गट क्रमांक 122 मधील सांगवी खुर्द शिवारातील शेतात काम करीत असताना तीन वाजेच्या सुमारास पांढर्‍या रंगाची हाफ पँट व पांढर्‍या रंगाचा टी शर्ट घातलेला तसेच काळपट रंगाची पँट व आकाशी रंगाचा टी शर्ट घातलेल्या 20 ते 25 वर्षीय अनोळखी तरुणांनी शेतात प्रवेश करीत शेतकर्‍याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या पँटमधून सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल काढला तसेच दुचाकीची चावी हिसकावून पळ काढला. तपास उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.