चाळीसगाव । बोढरे शिवारात फर्मी सोलर कंपनीत शेती जावुन पैसे मिळत नसल्याने आज 17 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या कन्नड घाटाच्या खाली असलेल्या फर्मी सोलर कंपनीत गेलेल्या स्वतःच्या शेतातच तालुक्यातील बोढरे येथील महिलेने कपाशी पिकावरील फवारणीचे विषारी औषध सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेवर चाळीसगाव येथील डॉ.जयवंत देवरे यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तालुक्यातील बोढरे शिवारातील कन्नड घाटाच्या पायथ्याशी फर्मी सोलर कंपनीचे शेकडो एकर जमिनीवर सौर ऊर्जा तयार करण्याच्या कंपनीचे काम सुरु आहे. या कंपनीसाठी ज्या जमिनी घेतल्या, त्या वादाच्या जमिनी असुन कंपनी सुरु करण्यासाठी कंपनी प्रशासनाने कुठलाही परवानगी घेतली नाही व कंपनीचे काम बंद करावे, यासाठी संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ यांनी 26 फेब्रुवारी 2018 रोजी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.