शहादा । शहादा तालुक्यातील शेतक-यांनी आता पावसाला सुरूवात झाल्याने पेरणीला व शेती कामांना सुरूवात केल्याचे दिसत आहे. जून महिन्याच्या 6,7 तारखेला पडलेल्या पावसावर ठराविक शेतक-यांनी पेरणी केली होती.माञ पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली.आता तालुक्यास तीन-चार दिवसापासुन पाऊस रोज हजेरी लावत असल्याने शेतकर्यानी पेरणी व शेती कामांना सुरवात केली आहे.त्यात कापूस ,मका ,ज्वारी,सोयाबीन आदि पिकांना प्राधान्य दिले जात आहे. तालुक्यातील उत्तर,पश्चिम भागात कुपनलिकांना थोडे फार पाणी असल्याने ते शेतकरी ठिबक वर टोचण पद्धतीने कापूस लावण्यात आला आहे.कापूस,ज्वारी, मका पिकांचे अनेक वाण, खते,बियाणे बाजारात दाखल झाले आहेत. ते खरेदी करतांना फसवणुकी पासून सावध रहा असेही मार्गदर्शन कृषी विभागाकडून होत आहे.