धुळे । धामणगाव येथील बारकु सरदार पाटील (59 ) आणि गोरख सरदार पाटील (60) या दोघा वृध्द शेतकर्यात वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरुन वाद सुरु होता. दि.6 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता वणी खुर्द शिवारातील शेत गट क्र.110/2 मध्ये बारकु पाटील यास एकटे गाठून गोरख पाटील व त्यांचा मुलगा प्रविण पाटील याने शिवीगाळ केली. शिवाय मारहाण करीत त्यांना जमिनीवर पाडून पुतण्या प्रविण याने त्यांच्या तोंडात विषारी औषध टाकले. याप्रकरणी बारकु पाटील यांनी थेट न्यायालयात तक्रार केल्याने न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असून धुळे तालुका पोलिसांनी बारकु पाटील यांची तक्रार नोंदवून घेत पुतण्या प्रविण गोरख पाटील व भाऊ गोरख सरदार पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.