तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील रूडसेट संस्थेच्या वतीने शेतीपूरक व्यवसाय म्हणून मोफत शेळीपालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केलेले असून इच्छुकांनी आपली नावे संस्थेकडे नोंदवावी असे आवाहान संस्थेचे व्यवस्थापक सुनील मेहेंदळे यांनी केले आहे.
शेळीपालन प्रशिक्षण दि. 24 एप्रिल पासून सुरू होत असून ते एकूण 10 दिवस चालणार असल्याचे प्रशिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. या प्रशिक्षण वर्गात शेळीपालन या व्यवसायाची माहिती, शेळीच्या आजारांची माहिती तसेच देशातील चांगल्या शेळीच्या जातीची माहिती, मार्केटिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट आदी विषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात निवास, नाश्ता, चहा, जेवण हे सर्व विनामूल्य आहे. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण करणार्याला शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी सर्व इच्छुक/गरजू उमेदवारांनी संस्थेशी संपर्क साधावा. संपर्क फोन 9766680816 , 7350008048 व 02114-225504 हे प्रशिक्षण वय वर्ष 18 ते 45 या वयोगटातील सर्वाना उपलब्ध आहे.