शेती उपयोगी साहित्याची सातत्याने चोरी

0

शहादा । तालुक्यात शेतशिवारातून शेतीपयोगी साहित्य सातत्याने चोरीस जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. साहित्यचोरी करणारी टोळी माहित असते पण त्यांना जेरबंद करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. एका बाजुला शेतीमालाला भाव नाही कर्जात शेतकरी डुबला आहे. दुबार पेरणी करावी लागली या संकटात असताना आता नवीन संकट निर्माण झाले आहे. चोऱटे रात्रीतुन शेतीउपयोगी साहित्य चोरीस नेतात. त्यात पिकाना पाणी देण्यासाठी वापरात येणार्‍या ठिबकसिंचनाचा नळ्या अक्षरश; मोठमोठ्या बंडलासह बांधून नेतात.

ठिबकसिंचनाच्या नळ्या गेल्या चोरीस
गेल्या पंधरा दिवसात पिंगाणे कलसाडी परिसरातुन सातत्याने ठिबकसिंचनाचा नळ्या चोरीस गेल्या आहेत. शेती उपयोगी साहित्य चोरी करणारी स्वतंत्र टोळी कार्यरत असुन चोरीचे साहित्य सटाणा नाशिक भागाकडे नेत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीसानी या चोरट्यांचा पर्दाफाश करावा. त्याना जेरबंद करावे अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे. चोरटे सापडत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातुन साहित्य जरी चोरीस गेले तरी फिर्याद देत नाही अशी परिस्थिती आहे. शहादा तालुक्यातील शेतकर्यानी जिल्हाधिकारी कार्यालयावर या विरोधात भव्य मोर्चा काढला होता.याचा काहीही उपयोग झाला नाही. शहादा शहरात शेतीउपयोगी साहित्य कोण खरेदी करतो ? असा व्यवसाय करणार्यांचा शोध घ्यावा शेतातील केलेल्या पाईप लाईनचे पाईप चोरीस नेवुन त्याची विक्री होते.