पालघर । ग्रामीण भागातील महिलांनी शेती यंत्र वापर करण्याचे व देखभाल दुरुस्ती करण्याचे प्रशिक्षण घेतल्यास त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. हे तंत्रज्ञाना महिलांनी समजून घेत त्याचा वापर आपल्या शेतीव्यवसायत करण्यासाठी पुढाकार घेतला तर निश्चितच त्या प्रगती साधू शकतील, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मासवण येथे केले. जिल्हा परिषदेने तालुक्यातील मासवण येथे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत औजार बँकेचे उद्घाटन बोरीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकरी महिलांना औजारे भाडेतत्त्वावर देण्यात येणार
या औजार बँकेच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी महिलांना शेतीच्या उपयोगी येणारी औजारे भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मळणी यंत्र, भात कापणी यंत्र व अन्य औजारांचा समावेश आहे. वाढत्या महागाईच्या काळात भातशेती परवडेनाशी झाली आहे. शेतीसाठी बाजारात येणारी नवनवीन अवजारे ही महाग असल्याने ती खरेदी करणे शेतकर्यांना शक्य नाही. त्यातून औजार बँकेची संकल्पना पुढे आली आहे.