शेती, छोटे उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

0

नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात नाबार्डला २५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सीआयडीबीआयला १५ हजार कोटी आणि एनएचबीला १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. नाबार्डकडून शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा केला जातो. एसआयडीबीय छोटया उद्योगांशी संबंधित असलेली बँक आहे. तर एनएचबी गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित असलेली बँक आहे.

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व व्यवसाय बंद आहेत. यामुळे देशाला दररोज ३५ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशाच्या विकास दराला ८ लाख कोटींचा फटका बसला होता. जगभरातील अर्थव्यवस्थांना कोरोनाच फटका बसला असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी रिझर्व्ह बँककडून आज अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस देण्यात आला. रिव्हर्स रेपो रेट मध्ये कपात करण्यात आली असून २५ बेसिस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता हा रेपो रेट ४ वरून ३.७५ वर आला आहे. रेपो दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. यामुळे गृहकर्जेे स्वस्त होतील.

अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती

कोरोनाचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. आरबीआय देशात नवीन छापलेले चलन आणत आहे. कोरोनामुळे निर्यात घटली आहे. तसेच वीजेची मागणीही कमी झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विक्री घटली आहे. बाजारात चलनाची कमतरता भासू न देणे. बाजारांचे कामकाज प्रभावित न होऊ देणे हे लक्ष समोर ठेवण्यात आले आहे. आपला डेटा सांगतोय की, इंटरनेट बँकिंगद्वारे चांगले काम होत आहे. अडचणींमध्येही एटीएमद्वारे चांगले काम होत आहे. जागतिक मंदीच्या संकटात २०२० मध्ये भारताचा विकास दर सकारात्मक राहणार असून १.९ टक्के राहिल असा अंदाज आहे, असे दास यांनी सांगितले. जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. सध्या मानवतेसमोर करोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले.