औरंगाबाद । उध्दव ठाकरेंच्या शिवसंपर्क मोहिमेत हृदयाला हात घालणारे अनुभव येत आहेत. शेतकरी आपली पोटतिडीक त्यांच्यासमोर मांडत आहेत. ङ्गठाकरे साहेब, डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. आता पेरणीसाठी कुणीच कर्ज द्यायला तयार नाही. जमापुंजी मिळून माझ्याजवळ फक्त साडेतीन हजार रुपये शिल्लक आहेत. तुम्हीच सांगा या पैशात पेरणी कशी करूफ, असा प्रश्न करत हताश झालेले पळशीचे शेतकरी नानासाहेब पळसकर यांनी चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पैसे ठेवले. हे पाहून ठाकरे यांनाही गलबलून आले. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला रविवार औरंगाबादपासून सुुरूवात झाली असून पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले होते. त्यामुसार त्यांनी औरंगाबादमधील शोतकर्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकर्यांनी त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या.
ठाकरेंचे आश्वासन
कर्जमाफीऐवजी शिवसेना थेट कर्जमुक्ती करण्याची मागणी करत आहे. शेतकर्यांनी साथ दिल्यास टोकाची भूमिका घेऊन तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी शेतकर्यांना दिले. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियातून मराठवाड्यातील 48 विधानसभा मतदारसंघांत 48 आमदार, नगरसेवकांनी शेतकर्यांशी आणि सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचा आढावा घेण्यासाठी ठाकरे रविवारी शहरात आले होते. सुभेदारी विश्रामगृहात पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक यांच्यासोबत चर्चा करण्यापूर्वी ठाकरे यांनी पळशी, ओहर, मोहर, कच्ची घाटी आदी ठिकाणच्या 18 शेतकर्यांशी संवाद साधला. संघटना बांधणीसह शेतकर्यांचे प्रश्न समजण्यासाठी शिवसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे.
महिला आघाडीला हाकलले : सर्वच पदाधिकारी, नगरसेवक सुभेदारीवर आले होते. मराठवाड्यातील आमदार, खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते आल्याने गर्दी होती. त्यामुळे स्वागत स्वीकारण्याचे प्रकार कमीच झाले. महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी मात्र ठाकरे यांचा दोनदा सत्कार करण्याचा प्रयत्न केला; रिष्ठ नेत्यांनी दोन्ही वेळेला त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. यामुळे महिला नाराज झाल्या.