पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथे शेतीच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाल्याने त्यात एकावर चाकूने वार करत तर अन्य तिघांना दांड्याने जखमी केले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांत वैशाली पाटील (रा.शास्त्रीनगर, तामसवाडी) यांनी फिर्याद दिल्यानंतर शनिवार, 18 रोजी सकाळी 10 वाजता शेतात काम करीत असताना आमच्या शेतालगत शेत असलेल्या शिवाजी विक्रम पवार यांना आमच्या शेतात फेकलेली घाण उचलण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने ते व त्यांची पत्नी कल्पनाबाई, मुलगा रोहित हे लाकडी दांडा व चाकू घेऊन अंगावर धावून आले. मला दांड्याने तसेच माझे सासरे रमेश पवार, पती संजय पवार यांनाही मारहाण करून जखमी केले. रोहितने दीर राजेंद्र पवार यांनाही मारहाण व चाकूने जखमी करत धमकी दिली. सर्व जखमींनावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.