शेती साहित्य चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा - धुपेश्वर रस्त्यावर केली दोघांना अटक

मुक्ताईनगर । प्रतिनिधि 

कुऱ्हा परिसरातील शेती साहित्य चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली . अटक केलेल्या चोरट्यांकडून इतर चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे .

 

गेल्या काही दिवसांपासून कुऱ्हा परिसरातील शेतातील मोटार पंप ,स्प्रिंकलर,केबल , पाईप, ठिंबक नळ्या अशा शेती साहित्याची चोरी होण्याच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत . अशाच प्रकारे एक चोरीची घटना दि.२३ ते २४ रोजी रात्रीच्या सुमारास राजू हनीफ खान रा. कुऱ्हा यांच्या शेतात घडली असून राजू हनीफ खान यांच्या फिर्यादीवरून काकोडा शिवारातील शेतात चोरी करतांना बिस्मिल्ला शहा अयुब शहा ,मोईन सुपडू शहा,दोघेही रा.मुस्ताक अलीनगर पारपेठ मलकापूर या दोघांनाही पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप दूनगहू, सहायक फौजदार संतोष चौधरी, पोलीस नाईक प्रदीप इंगळे,हरीश गवळी, पोलीस कॉन्स्टेबल सागर सावे, राहुल नावकर, अनिल देवरे, गोपीचंद सोनवणे, होमगार्ड रवी जाधव यांनी गुप्त माहितीनुसार सापळा रचून दोघांनाही धुपेश्र्वर रस्त्यावर अटक केली . त्यांचेकडुन ४००० रु.किं.ची एक लक्ष्मी कंपनीची ३ हॉर्स पावरची ईलेक्ट्रिक पाण्याची मोटर अशा वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप मोहन इंगळे करीत असुन चोरट्यांकडून परिसरातील चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही .