रावेर:- तालुक्यातील कर्जोद शिवारातील शेतात गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास अनधिकृतरीत्या प्रवेश करीत शेतात शेड टाकून शेत मालकास धमकावल्याप्रकरणी चौघांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सुनील सोापान महाजन (42, चोरवड, ह.मु.अष्टविनायक नगर, रावेर) यांनी तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी नारायण राणा चारण, गोकुळ नारायण चारण, लागू नारायण चारण व देविदास नारायण चारण यांच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 29 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीच्या शेत गट नंबर 447 ब मध्ये मध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश करीत पत्री शेड उभारत शेत मालकास दम दिल्याचा आरोप आहे.