नवी दिल्ली । वाढत्या वयामुळे धोनीला त्याच्या फॉर्मवरून लक्ष्य केले जात असताना ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न मात्र धोनीची स्तुती करत त्याची पाठराखण केली आहे. धोनीला कुणासमोर स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही, असे शेन वॉर्नने म्हटले आहे. आयपीएलमध्ये धोनी रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाचे प्रतिनिधित्व करतो आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच धोनीला कर्णधारपदावरून हटवून स्टीव्ह स्मिथला कर्णधार करण्यात आले. त्यानंतर धोनीच्या फॉर्मवरूनही त्याला लक्ष्य करण्यात आले. इतकेच नव्हे, तर सौरव गांगुली आणि मायकेल क्लार्क यांनीही धोनीच्या सध्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर सोशल मीडियावरही धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली. सेहवागनेही धोनीची ताकद समजून घेण्यासाठी आयपीएल ही काही योग्य स्पर्धा नाही, असे म्हणून ‘कॅप्टनकुल’ला पाठिंबा दिला होता.