जळगाव । स्टूलवर बसण्याच्या कारणावरून दोघांनी एकाला शिवीगाळ करून मारहाण तर मुलाला दगड मारून डोक्याला जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात मारहाण करणार्या दोघांविरून गुन्हा दाखल करण्यात आली आहे. शेख मंजूर शेख याकुब (वय-40) रा.कोल्हे बिल्डींग समोर जळगाव हे रात्री 9.15 वाजेच्या सुमारास आपल्या मुलगा शेख जहिर शेख मंजूर शेख सोबत सायंकाळी शेरा चौकात भेळ खाण्याच्या निमित्ताने गेले.
भेळ दुकानाजवळी असलेल्या स्टुलवर बसले. काही वेळानंतर आरोपी जुबेर शेख आणि आरिफ पटेल (पुर्ण नाव नाही) दोघे रा. संतोषीमाता नगर हे आल्यानंतर काहीही एक कारण नसतांना आरोपी जुबेर शेख याने शिवीगाळ करून स्टुलवरून उठविले त्यानंतर त्याला विरोध केला असता पुन्हा शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. शेख मंजूर शेख याकुब यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात जुबेर शेख आणि आरिफ पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास राजाराम पाटील हे करित आहे.