रावेर : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील शेरी नाक्याची गुरुवारी प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगणे यांनी कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर भेट देवून पाहणी केली. प्रांतधिकारी व तहसीलदार यांनी गुरुवारी सकाळी खिर्डी येथे भेट दिली व गावातील ग्रामस्थांनी जमा केलेले किट्स गरजु कुटुंबाना दिले. त्यानंतर त्यांनी खिरोदा येथे जाऊन रेशन कार्ड संदर्भातील तक्रार सोडवली व त्यानंतर मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील शेरी नाक्याची त्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना येथे असलेल्या पोलिस, शिक्षक व आरोग्य प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रावेर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांउे उपस्थित होते.