शेलवड येथे कोतवाल यांच्यावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या वाळू माफियांना तात्काळ अटक करा यावल कोतवाल संघटनेची मागणी .
यावल (प्रतिनीधी )बोदवड तालुक्यातील शेलवड येथील कर्तव्यावर कार्यरत असतांना कोतवाल यांचे वर दिनांक १२ सप्टेंबर रोजी अवैध गौणखनिज माफीया यांचे कडुन झालेल्या जिवघेणा हल्ला व त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या प्रकणातील आरोपीना तात्काळ अटक करून त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी असे निवेदन यावल तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आले आहे .
जळगांव जिल्हयात व महाराष्ट्रात मोठया प्रमाणात होत असलेल्या अवैधरित्या गौणखनिज उत्खन्नच्या वाहतुकीस आळा बसविणे कामी कोतवाल कर्मचारी नेहमी आपले कर्तव्य चोख पणे बजवित असतात, अलीकडच्या काळात बामणोद मंडळ अधिकारी श्रीमती बबीता सुधाकर चौधरी, व रावेर परिविक्षाधीन तहसिलदार यांचेवर गौणखनिज माफीयाच्या माध्यमातुन हल्ले करण्यात आले असुन , त्याच प्रमाणे दिनांक १२/०९/२०२३ रोजी बोदवड तालुक्याचे तहसिलदार यांनी अवैध गौणखनिज वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे पकडुन शेलवड तालुका बोदवड येथील कोतवाल गजानन सुभाष अहिरे यांचे ताब्यात देऊन सदरचे वाहन बोदवड तहसिल कार्यालयात पुढील कार्यवाही करीता जमा करणे बाबत सुचना दिल्यात तदनंतर तहसिलदार हे पुढील कार्यवाही करीता रवाना झाले त्यानंतर कोतवाल गजानन अहिरे आपले कर्तव्य चोखपणे बजवीत असतांना सदर अवैध गौणखनिज वाहतुक करणारे ट्रक्टर मालक,चालक व इतर काही जणांनी कोतवाल गजानन सुभाष अहिरे यांच्यावर जिवघेणा हल्ला केला व त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ट्रक्टरसह पसार झाले . या संदर्भात आरोपी विरुध्द बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला . तरी या गुन्हेतील अरोपीना तात्काळ दिनांक १३ / ०९/ २०२३पर्यंत अटक झाली पाहिजे तसेच त्यांचे विरुध्द एमपीडीए कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात येवुन कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी त्यांचे विरुध्द कारवाई न झाल्यास दिनांक १४सप्टेंबर पासुन यावल तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचारी हे कामबंद आंदोलन करणार आहे तसेच अवैध गौणखनिज माफीया यांचे कडुन होत असलेल्या हल्यामुळे कोतवाल कर्मचारी यांना सरंक्षण दिले पाहिजे, गजानन अहिरे कुटुंबातील सदस्य व तालुक्यातील सर्व कोतवाल कर्मचारी हे झालेल्या या घटनेमुळे अतीशय घाबरलेले अवस्थेत असुन, त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी कोतवाल संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे . सदर निवेदनावर कोतवाल संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विशाल राजपूत उपाध्यक्ष जयश्री कोळी, सचिव ओंकार सपकाळे, प्रशांत सरोदे, सागर तायडे ,धनराज महाजन , विजय आढाळे ,निलेश गायकवाड, सोनू सिंग राजपूत, सागर साळवे , विकास सोळंके आदींच्या स्वाक्षरी आहे.