शेलवलीचे वीज रोहित्र बसवले

0

किन्हवली । शहापूर तालुक्यातील शेलवली(बां) येथील वीज रोहित्रावर वीज पडून जळाल्याने नवीन रोहित्र बसवण्याबाबत वारंवार चकरा मारूनही वीज कर्मचारी दाद देत नव्हते. ग्रामस्थांना एक महिन्यापासून कृत्रिम पाणीटंचाई जाणवत असल्या बाबतचे वृत्त निकामी झालेल्या रोहित्राच्या छायाचित्रासह आज (दि.7) दै.जनशक्ति मध्ये प्रसिद्ध होताच विज वितरणाच्या किन्हवली व शहापूर उपविभागीय कार्यालयाने त्वरीत कार्यवाही करून आज सकाळी 100 केव्हीचे रोहित्र बसवले. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. येथील ग्रामपंचायत व नागरिकांनी दै.जनशक्तीला धन्यवाद दिले आहेत.