निमगाव केतकी । साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे शांताई विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित 17 वयोगटातील मुलांची एकदिवसीय खो-खो स्पर्धा मुक्ताबाई मंदिर मैदानावर पार पडली. या स्पर्धेत इंदापूर व बारामती तालुक्यातील सुपा, काझड, वरकुटे खु, शेळगाव, जंक्शन येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक माजी हॉलीबॉलपट्टू विठ्ठल गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शांताई विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कर्मयोगीचे संचालक आबासाहेब शिंगाडे, तंटामुक्ती अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे, छगन शिंगाडे, रणजित सुपुते, नितीन नेवसे, अनिल जाधव, महेश खराडे, नितीन जाधव, सयाजी येवले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेस पंच म्हणून संदीप बल्लाळ आणि क्रीडाशिक्षक कैलास जाधव यांनी काम पाहिले.