शेळगाव बॅरेजच्या तापी नदीकाठावर पाण्यात भुसावळच्या हरविलेल्या महिलेचे मिळाले मृतदेह पोलिसात घटने नोंद

यावल (प्रतिनिधी ) भुसावळ शहरातील द्वारका नगरातील रहिवासी सुरेखा जितेंद्र उईके (वय ४४) वर्षे या महिलेचा मृतदेह यावल- जळगाव तालुक्याच्या सीमेवरील असलेल्या शेळगाव बॅरेज,तापी नदीच्या किनाऱ्यावर आढळून आला असुन याबाबत ची खबर मृतक महिलेचे पती जितेंद्र उईके यांनी दिल्यावरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत जितेंद्र उईके यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे की मयत पत्नी सुरेखा जितेंद्र उईके ही २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी काही एक न सांगता निघून गेल्या होत्या . सदर महिलेची स्कुटी ही भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावर आढळून आली होती याबाबत भुसावळ शहरच्या पोलीस ठाण्यात सदर महिला या हरविल्या बाबत तक्रार दाखल करण्यात आली होती रविवारी सकाळी महिलेचा मृतदेह आज शेळगाव बॅरेजच्या किनाऱ्यावर आढळून आला यावरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे. मयत महीला यांना एक मुलगा एक मुलगी,पती असे कुटुंब असुन दरम्यान सदर महीलेने आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ठ होवु शकले नाही .