JDCC Bank branch in Shelawe Budruk village broken: luckily the ‘safe’ was not broken पारोळा : पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक गावातील जेडीसीसी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी 1 व 2 नोव्हेंबरच्या दरम्यान रात्रीच्या वेळी रोकड लुटीचा प्रयत्न केला मात्र तिजोरी उघडता न आल्याने त्यातील रोकड सुरक्षीत राहिली. चोरट्यांनी बँकेच्या लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून पोबारा केल्याचे उघडकीस आले असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात उडाली खळबळ
बुधवार, 2 नोव्हेंबरच्या सकाळी बँकेच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप व कडी-कोयंडा तुटल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पारोळा पोलिस स्टेशनला देण्यात आल्यानंतर निरीक्षक रामदास वाकोडे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. शाखा व्यवस्थापक जिजाबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.