जळगाव । शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय तंत्रशुद्ध व काटेकोर व्यवस्थापनातून केल्यास शेतकर्यांचे जीवनमान उंचावेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी शेळीपालन कार्यशाळेत केले. यावेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधिकारी सुरेंद्र पाटील, आत्माचे उप प्रकल्प संचालक के. डी. महाजन, जैन इरिगेशनचे बी. डी. जडे, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी विलास सनेर, धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राचे विपुल वसावे, पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश चोपडे, डॉ. निलेश बारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे एच. आर. कोळी, अजय पाटील, डॉ. प्रेमचंद बारी आदी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधिकारी सुरेंद्र पाटील, आत्माचे उप प्रकल्प संचालक के. डी. महाजन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ बी. डी. जडे, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण, धरणगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विलास सनेर, धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राचे पशुविज्ञान शास्त्रज्ञ विपुल वसावे, पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश चोपडे, डॉ. निलेश बारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे उपप्रबंधक एच. आर. कोळी, ए. पी. कन्सल्टन्सीचे अजय पाटील, अनुभवी शेळीपालक डॉ. प्रेमचंद बारी आदी उपस्थित होते.
शेळीपालन पुस्तकाचे प्रकाशन
अॅग्रोवर्ल्डचे संपादक चव्हाण यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. विपुल वसावे यांनी शेळ्यांच्या जाती, निवड व आहार व्यवस्थापन याची माहिती दिली. डॉ. चोपडे यांनी शेळीपालनाच्या शासकीय योजना, आरोग्य व्यवस्थापन व लसीकरणाची माहिती दिली. कार्यशाळेच्या ठिकाणी शेळीपालन व्यवसाय नव्याने सुरु करणार्या शेळीपालकांसाठी उपयुक्त ठरणार्या अॅग्रोवर्ल्ड पब्लिकेशनच्या व्यावसायिक शेळीपालन, या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व उपस्थित मान्यवरांनी केले.