शेळ्या चारणाऱ्या इसमाचा विजेचा धक्क्याने मृत्यू

0

सांडस : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या शिरसगाव काटा येथील शेळ्या चारण्यासाठी नदीकाठी गेले असताना विजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून एकाचा मृत्यू झाला.

दादा हरी केदारी असे मृताचा नाव आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीचे पुतणे बापू सोनबा केदारी यांनी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. केदारी हे शिरसगाव काटा येथील रहिवाशी असून ते शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी शेळ्या घेवून नदीकाठी गेले होते. त्यावेळी नदीच्या काठावर वीजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.शिरुरच्या पुर्व भागात विद्युत वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. या तारांमुळे सातत्याने काही ना काही नुकसानकारक घटना या अगोदर घडलेल्या आहेत.