शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी होऊ शकतात मोठ्या घोषणा; अर्थमंत्र्यांकडून संकेत

0

मुंबई-मोदी सरकारचा फेब्रुवारी २०१९ मध्ये शेवटचा हंगामी अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणेची शक्यता आहे. खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत संकेत दिले आहे. ते सध्या अमेरिकेत उपचार घेत आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आगामी अर्थसंकल्पात शेतीविषयक समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात खाद्य उत्पादन होत आहे, त्यामुळे किंमती कमी झाल्या आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर उपाय काढला जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.