शेवटच्या क्षणात सामन्याचे चित्र पालटले

0

ग्लासगो । स्वित्झर्लंडच्या ग्लासगो शहरात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. सामना संपल्यावर तिने सांगितले की, मी दुःखी आहे. तिसर्‍या डावात 20-20 अशा बरोबरीत असताना हा सामना कोणीही जिंकू शकले असते. दोघांचे लक्ष्य सुवर्णपदकाकडे लागलेले असताना अचानक शेवटच्या काही क्षणांमध्ये खेळाचे चित्रच पालटून गेले.

सामना अतिशय कठीण :
तिने सांगितले की, नोझुमी ओकुहाराला हरवणे सोपे नव्हते. खेळ सोपा नव्हता. तो खूप कठीण होता. मी ही जिद्दीने खेळले. एकही शटल सोडला नाही. मी खूप वेळ खेळण्यासाठी देखील तयार होते. पण तो माझा दिवस नव्हता. 1 तास 49 मिनिटांपर्यंत चाललेल्या या सामन्याबद्दल तिने सांगितले की, हा सामना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप कठीण होता. स्पर्धेमधील सगळ्यात जास्त वेळ खेळला गेलेला हा सामना होता.

भारतीय जनता समाधानी :
सिंधूने सांगितले की, जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपदाचा अंतिम सामना भारतीयांसाठी समाधानकारक होता. सायना आणि सिंधू यांच्या खेळामुळे भारताला मिळालेल्या दोन्ही पदकांचा भारतीयांना अभिमान आहे. त्याचबरोबर माझ्या देशासाठी पदक जिंकल्याचा मला देखील अभिमान आहे. यामुळे मला आत्मविश्वास मिळाला असून मी भविष्यात देशासाठी अधिकाधिक पदके जिंकेन.