मुंबई-शासनाने तुरीपाठोपाठ हरभ-याचीही खरेदी पूर्ण होण्याआधीच खरेदी केंद्र बंद केले आहेत. त्यामुळे हजारो शेतक-यांचा लाखो क्विंटल हरभरा खरेदी अभावी नोंदणी करूनही पडून आहे. खरेदी केली जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने शेवटच्या शेतक-याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावीत तसेच या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
तुरीपाठोपाठ हरभ-याचीही खरेदी पूर्ण होण्याआधीच सरकारने हरभरा खरेदी केंद्र बंद केले आहेत.हजारो शेतक-यांचा लाखो क्विंटल हरभरा खरेदी अभावी नोंदणी करूनही पडून आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेवटच्या शेतक-याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावीत या योजनेला मुदतवाढ द्यावी. pic.twitter.com/sAxzeWkpTw
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 30, 2018