अमळनेर । राजकारणात अनेक चढउतार पाहिले आहेत ज्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला त्यांनीच वेळोवेळी माझा घात केला आता माझ्या देवदूर्लभ कार्यकर्ते यांच्या जोरावर राष्ट्रवादीत शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन पुन्हा भाजपात जाण्यापेक्षा मी राजकारणाला पूर्ण विराम देणे पसंत करेल असे मत अनिल भाईदास पाटील यांनी पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त केले. गेल्या आठवड्यात नगरपालीका राजकारणात झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादीची शनिवारी 2 रोजी अन्नपूर्णा मंगल कार्यालयात पक्षाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.सतिष पाटील होते. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश घेतला होता त्यांचीही या ठिकाणी उपस्थिती होती. प्रस्ताविक माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी रविंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, माजी झेडपी अध्यक्ष गोरख पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा संघटक विलास पाटील, वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, रंजना देशमूख, रिटा बाविस्कर, योजना पाटील, गोविंद पाटील, संदीप पवार, अशोक पाटील, डॉ.अशोक पाटील, संजय पाटील , रणजीत पाटील, रामकृष्ण पाटील, एल.टी.पाटील, देवीदास देसले, प्रा.सुरेश पाटील, मुख्तार खाटीक, इम्रान खाटिक, सचिन पाटील, जे.के.पाटील, बाळू पाटील, गौरव पाटील, महेश पाटील, हीरालाल भील यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जाणार्यांना जाऊ द्या
कार्यकर्त्यांना पक्षात आता खर्या अर्थाने मोकळा श्वास घेता येत असून जे गेले ते जाऊ द्या, आणि जे जाण्याच्या तयारीत आहेत त्यांना म्हणाव दिल्या घरी सूखी रहा असा टोला माजी आमदार साहेबराव पाटील यांचे नाव न घेता माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गूजराथी यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री गूलाबराव देवकर, माजी खासदार अँड वसंतराव मोरे, जिल्हा बँक संचालीका तिलोत्तमा पाटील, रामकृष्ण पाटील, शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
पुढचे आमदार अनिल भाईदास
कर्तुत्व व निष्टा महत्वाची असते. जि.प.सदस्या मिना पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील राष्ट्रवादीचे राहिले असते तर इथे आले असते. त्यामुळे त्यांचा विषय संपलेला आहे. अमळनेर तालुक्याचा भविष्यातील आमदार हे अनिल भाईदास पाटील हेच आहे. असे त्यांनी सांगितले. आज खरा खंदा नेता व कार्यकर्ता सांभाळनारा नेता मिळाला आहे. असे आमदार सतीष पाटील यांनी सांगितले.
नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.सतिष पाटील यांनी खरी नैतिकता असेल तर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा पुष्पलता साहेबराव पाटील यानी द्यावा व भाजपाच्या तिकीटावर निवडून दाखवावे व उदय वाघ यांनी त्यांची उमेदवारी जाहिर करावी असे अवाहन केले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या तिकीटावर जनतेने पुष्पलता पाटील यांना निवडून दिले आहे. त्यांनी पक्षांचा तसेच जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.