शहादा । शहादा ते दरा फाटा दरम्यान होळ गुजरी शिवारात श्री श्री नारायनपुरम भागात शेषशाही महाविष्णु भगवान मंदिराचे भूमिपूजन संतश्री लोकेशनंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील होळ गुजरी शिवारात चार एकर परिसराचे श्री श्री नारायनपुरम असे नामकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी 26 हजार स्के. फुट जागेत शेषशाही महाविष्णु भगवान मंदिर साकारण्यात येणार आहे. संतश्री लोकेशानंद महाराज यांनी चांदीच्या कुदळीने मंदिराचे भूमिपूजन केले. यानिमित्ताने दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले.
50 घनफुट दगडांवर होणार कोरीव काम
या मंदिरासाठी 50 घनफुट दगडांचा वापर करण्यात येणार असून राजस्थान येथून हे दगड मागविण्यात आले आहे. तेथील कारागिरांकडून दगडांवर कोरिव काम सुरु असून मंदिरात लोखंडाच्या कुठेही वापर होणार नाही. तीन वर्षात हे मंदिर उभारले जाणार असून मंदिरासाठी वापरल्या जाणार्या दगडांवर 60 देवी देवतांचे कोरीव काम होणार आहे. मंदिराच्या मुख्य गाभार्यात 11 फुट लांबीची अष्टधातुपासून बनविलेली शेषशाही महाविष्णु भगवान यांची शयनरूपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. भूमिपूजनप्रसंगी जगदीश पाटील, शांतिलाल पाटील (पिम्परी), उज्वल पाटील (शहादा), कैलास गोयल (पानसेमल), सुभाष पाटील (मडकाणी) व भाविक उपस्थित होते.